OpenStreetMap (OSM) "ओपन स्ट्रीट मॅप" वर मराठी भाषेतील माहिती वाढवण्यासाठी काही साधने व मार्गदर्शक माहितीचा संग्रह.
OpenStreetMap हा मानचित्रकारांनी उभारलेला एक प्रकल्प आहे ज्यात जगभरातील रस्ते, पायवाट, कॅफे, रेल्वे स्थानक व इतर बऱ्याच गोष्टींचा डेटा योगदानातून तयार व व्यवस्थापित केला जातो.
OSM नकाशा इथे पहा.
सध्या OSM वर मराठी भाषेत माहिती खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. माहिती मुखतः दोन ठिकाणी जोडायची आहे -
१. OSM नकाशावर
२. OSM विकी (ज्ञानकोश) वर - जिथे, OSM म्हणजे काय? त्याचे फायदे? कसे वापरायचे? नकाशावर डेटा कसा जोडायचा? व इतर प्रश्नांची उत्तरे सखोल माहितीसह उपलब्ध आहे.
भारतात ठिकाणे जोडण्याचे मार्गदर्शक (अद्याप मराठीत उपलब्ध नाही) -
- https://wiki.openstreetmap.org/wiki/India/Places
- https://wiki.openstreetmap.org/wiki/India/Administrative_Boundaries
OSM वरील मराठी name:mr
नावाच्या टॅगची माहिती:
https://taginfo.openstreetmap.org/keys/name%3Amr
मराठी नाव (name:mr
टॅग) नसलेल्या ठिकाणाची संख्या -
ठिकाण वर्ग | place=? टॅग | अपूर्ण संख्या (२०२२-५-२६ रोजी) | नकाशावर पहा. (दुव्यावर जाऊन "Run" दाबा) |
---|---|---|---|
शहर | place=city | ० 😃 | https://overpass-turbo.eu/s/1iFP |
नगर | place=town | ० 😃 | https://overpass-turbo.eu/s/1iFH |
उपनगर | place=suburb | १९६ (सर्व मुंबईत) 😟 | https://overpass-turbo.eu/s/1iFQ |
परिसर | place=neighbourhood | ५३६ 😟 | https://overpass-turbo.eu/s/1iFR |
गाव | place=village | ५०३८ 😢 | https://overpass-turbo.eu/s/1iFS |
खेडे | place=hamlet | ७६६ 😟 | https://overpass-turbo.eu/s/1iFX |
नंतर जोडणे
-
देवनागरी मध्ये लिहिण्यासाठी - https://www.google.com/intl/mr/inputtools/try/
-
अनुवाद तपासण्यासाठी -
- https://shabdakosh.marathi.gov.in/ (आधुनिक व तांत्रिक शब्द सापडतील)
- https://dsal.uchicago.edu/dictionaries/marathi/ (जुने शब्द सापडतील)
- https://translate.google.com/?sl=mr&tl=en&op=translate (कधीकधी चुकते. सावधानीने वापरावे.)
Overpass turbo हे नकाशावरून अनेक प्रकारचा डेटा खणून पाहण्याचे व निर्यात करण्याचे एक साधन आहे.
जादूगारचे उदाहरण -
१. महाराष्ट्रातील मराठी नावे नसलेली सर्व ठिकाणे = type:node and name=* and name:mr!=* and place=* in Maharashtra
(अर्थ - महाराष्ट्रातील (in Maharashtra
) नाव असलेले(name=*
), पण मराठी नाव नसलेल्या(name:mr!=*
) अश्या ठिकाणांच्या(place=*
) गाठी(type:node
))
२. महाराष्ट्रातील सर्व शाळा = type:node and amenity=school in Maharashtra
. २०२२-मे-२८ रोजी नकाशा -
३. अनेक ठिकाणांमधून शोधण्यासाठी प्रश्नांची संरचना - https://overpass-turbo.eu/s/1iQi
मराठी विकिपीडियातील उपयुक्त माहिती इथे साठवली आहे.